वाचा:
माघ कृष्ण १३ महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला पांढरा शुभ्र पोशाख तर पांडुरंगाच्या डोक्यावर सोनेरी टोप व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अंगावर अलंकार असा पेहराव करण्यात आला आहे. यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप मनोहरी दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात शेवंती व बेलपत्र पानांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली.त्यात बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यासाठी एक हजार टन फुलांचा वापर करण्यात आलाय.
दरम्यान, श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे.यामुळे श्रीविठ्ठलाचे हजारो भक्त रोज मुखदर्शन घेतात तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मंदीर प्रशासनाकडून सर्व दक्षता घेण्यात येत आहे व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिलीय.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times