अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले होते. संजय राठोड यांच्यावरील आरोपांवरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले होते. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपनं दिला होता. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारला राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. अधिवेशन सुरू असतानाच मनसुख हिरन प्रकरणावरून भाजपनं सरकारला धारेवर धरलं. पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर आरोप झाले. त्यामुळं त्यांचीही बदली करावी लागली.
वाचा:
महाविकास आघाडी सरकारकडे फक्त तीन महिने राहिले आहेत, असा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कालच दिला होता. त्याच्या या वक्तव्यामुळं वेगळीच चर्चा सुरू झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्याचा काळ उरला आहे, असं का म्हटलं असावं? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप अजूनही प्रयत्नशील आहे का? तीन महिन्यांत सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का?’, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवरच फडणवीस व पाटील यांनी आज सरसंघचालकांची भेट घेतली. या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, नंतरच्या विमानाने आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’ सुरू झालं आहे. तीन ते चार महिन्यात सरकार येईल, असा दावा केला. मुनगंटीवार यांनी दुसऱ्यांदा केलेलं हे वक्तव्य आणि भाजप नेत्यांची सरसंघचालकांशी झालेली भेट त्यामुळंच महत्त्वाची मानली जात आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times