नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तिसह आठ ब्राह्मणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या ट्रस्टमध्ये समाजाला स्थान न देण्यात आल्याने भाजपमधूनच जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राम मंदिर आंदोलनातील पहिल्या फळीतील भाजप नेत्याने या ट्रस्टमध्ये ओबीसींचा समावेश करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे ट्रस्टमधील सदस्यांची नियुक्ती भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची घोषणा केली होती. या ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. त्यातील ९ कायमस्वरुपी आणि ६ अस्थायी सदस्य असतील असं जाहीर करण्यात आलं होतं. ट्रस्टच्या डीडमध्ये ९ कायमस्वरुपी सदस्यांची नावंही देण्यात आली होती. शिवाय या समितीत दलित समाजातील एका व्यक्तिला घेतानाच ब्राह्मण समाजातील ८ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रस्टच्या या स्वरुपामुळे राम मंदिर आंदोलनातील पहिल्या फळीतील भाजपचे नेते अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या फळीतील हे नेते ओबीसी असल्याने ओबीसी समाजाला ट्रस्टमधून डावलल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

राम मंदिर आंदोलनासाठी आपली सत्ता पणाला लावणारे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि अयोध्या आंदोलनाच्या नेत्या असलेल्या यांनी ट्रस्टमध्ये ओबीसी सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. भाजपचे हे दोन्ही बडे नेते ओबीसी असून राम मंदिर आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या ट्रस्टमध्ये सरकारने दलितांसोबत ओबीसींचाही समावेश करावा. देशात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टमध्ये ओबीसींचा समावेश असावा, असं सांगतानाच या ट्रस्टवर मला जायचं नाही. मात्र ट्रस्टमध्ये ओबीसींचा समावेश असावा, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.

या मुद्द्यावरून मी कल्याण सिंह यांच्यासोबत आहे. कारण राम मंदिर आंदोलनात माझ्यासोबत अनेक ओबीसी कार्यकर्ते होते. ज्या काळात ओबीसी समाजवादावर प्रभावित होत होते, त्याकाळात ओबीसी कार्यकर्ते राम मंदिर आंदोलनाशी जोडले गेले होते, असं उमा भारती म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here