: पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम भागात निवडणूक प्रचारसाठी पोहचलेल्या मुख्यमंत्री या गंभीर जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या झाली आहे. उपचारासाठी ममतांना रात्री १३० किलोमीटर दूर कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ममता बॅनर्जी यांचे पुढच्या दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे घटनेवर विस्तृत अहवालाची मागणी केली आहे. उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पायाला-खांद्याला जखमा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्या पायाला, खांद्याला आणि गळ्यावर जखमा आहेत. तसंच त्यांच्या डाव्या पायाच्या हाडालाही गंभीर दुखापत झाली आहे. पाय सुजलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी श्वासोच्छवास घेण्यात अडथळे येत असल्याचंही म्हटलंय. यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढच्या ४८ तासांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी ममतांना जवळपास दीड महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

हल्ला सुनियोजित – ममतांचा आरोप

गर्दीत अचानक काही लोकांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्याला गाडीत ढकलून दिलं आणि त्यानंतर त्यांनी जबरदस्तीनं गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी आपल्यासोबत एकाही सुरक्षारक्षक नव्हता, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. हा हल्ला सुनियोजित असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांवर झालेल्या या हल्ल्यासंबंधी तृणमूल काँग्रेसचे नेते आज राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दुपारी १२.०० वाजता ही भेट होईल. ममता बॅनर्जी जायबंदी झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसनं आपल्या कार्यक्रमात काही बदल केले आहेत. पक्षाकडून आपलं निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम स्थगित केला आहे.

आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नंदीग्राममध्ये ममतांवरील कथित हल्ल्याचा निषेध केला.

तृणमूल काँग्रेसचे नेते यांनी ममतांचा फोटो शेअर करत भाजपवर निशाणा साधलाय. ‘भाजप २ मे, रविवारी बंगालच्या जनतेची ताकद पाहण्यासाठी तयार राहा’ असं ट्विट अभिषेक यांनी केलंय.

दुसरीकडे, ममतांकडून हल्ल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. ममतांची तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचं एक प्रतिनिधीमंडळही आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

‘ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या डोळ्यांतही पाणी होतं. आम्हाला या गोष्टीचं दु:ख आहे. परंतु, हा एक अपघात होता. एवढ्या गर्दीत गाडीतून बाहेर पडणं सोप्पं नसतं. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्यांना दुखापत झाली. परंतु, ममतांनी या गोष्टीचं राजकारण करू नये. ममतांनी आपल्याला झालेल्या दुखापतीवर सहानुभूती गोळा करू नये’ असं भाजप नेत्या यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here