मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत नाईक कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते आणि विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी मनसुख हिरन प्रकरणात सरकारला कोंडीत पकडून संपूर्ण विधानसभा हादरवून सोडली. त्याच प्रमाणे अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी अशी भूमिका का घेतली नाही?, फडणवीसांना गुप्तचर यंत्रणांकडून सीडीआर मिळतो मग तसा आम्हाला का मिळाला नाही?, असे प्रश्नावर प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. (anvay naik family criticizes opposition leader )

अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने मुंबईत आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरन प्रकरणाचा दाखला देत आम्हाला कसा न्याय मिळत नाही हे मांडले. एका व्यक्तीला दोन दिवसांमध्ये न्याय मिळतो. त्याच प्रमाणे केवळ संशयावरून पोलिस अधिकाऱ्याची बदलीही केली जाते. आणि आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावेही स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. असे असतानाही हे प्रकरण घडले तेव्हा विधानसभा अशीच हादवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला.

… मग आम्हाला न्याय का मिळाला नाही?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून सहजपणे CDR मिळतो. मग तशाच प्रकारे आम्हाला CDR का बरे मिळाला नाही?, असा थेट प्रश्न अन्वय नाईक यांच्या मुलीने विचारला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. तसेच या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे तीन आरोपींची नावे ही आहेत. असे असतानाही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘देवेंद्र फडणवीसांनी आमचे ऐकूनच घेतले नाही’

अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे काहीएक ऐकून घेतले नाही. आम्हाला दाद दिली नाही, असा गंभीर आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला आहे. आशियातील श्रीमंत व्यक्तीला जेवढ्या वेगाने न्याय मिळतो, तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना कधी मिळणारच नाही का, असा उद्विग्न सवालही नाईक यांच्या पत्नीने विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here