जयंत सोनोने,

करोनाच्या (Coronavirus) संकटकाळात निसर्गाने सुध्दा हातावर ‘तुरी’ दिसल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) जीवनावश्यक असलेल्या भाजीपाल्याची लागवड केली. सायोबीन, मुग, उडीद व कपाशीतील तूट भरुन काढण्यासाठी मोठ्या आशेने लावलेला बहरला. मात्र लग्न समारंभावरील निर्बंध, रद्द झालेल्या यात्रा-उत्सव व बंद असलेल्या हॉटेलमुळे पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपू, चवळी, मेथीच्या मागणीत मोठी घट आल्याने कष्टाने फुलवलेल्या मळ्यातील भाजीपाला गुरांसमोर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ( became animal fodder)

सरकारचे धोरण, मातीमोल भाव, बाजारातील एकंदर स्थिती यामुळे जेरीस आलेल्या शेतक-यांनी निराशेपोटी शेतातील पिके जनावरांपुढे टाकण्यास व पिकांवरून नांगर फिरविण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाउनच्या काळात बाजारात भाज्या, फळांचे भाव आसमानाला भिडत असून भाजीपाला मात्र गुराचा चारा झाला आहे.

भाजीपाला बागायतदार भाजीपाला शेतातच फेकून देत आहेत, तर काही शेतात जनावरांना पीक चारत असल्याचे दृश्य दिसत आहेत. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील भाजीपाला बाजार सुरू असला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, लग्न समारंभावरील निर्बंध, रद्द झालेल्या यात्रा-उत्सव व बंद असलेल्या हॉटेलमुळे पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपु, चवळी, मेथीच्या मागणीत मोठी घट आल्याने अडचणीत सापडला आहे.

भरउन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याच्या शेतात भाजीपाला पिकतो; पण विकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला खपत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तो बाजार समितीतच फेकून खाली हाताने घरी परतावे लागत आहे. बाजार समितीत पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपू, चवळी, मेथीला उन्हाळ्यात मोठी मागणी असे. २० ते ४० रुपये किलोचा भाव देणाऱ्या पालेभाज्या ३ ते ५ रुपये जुडी याप्रमाणे विकल्या जात आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

शेतकऱ्याने मांडली व्यथा

दिलीप तेलंग या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल योजने अंतर्गत शेतातील मुख्य रस्त्यावर शेतातील भाजीपाला विक्रीचे नियोजन असते. याकरिता आपल्या शेतातील सेंद्रीय भाजीपाल नागरिकांना मिळावा म्हणून शेतात पालकाची पेरणी केली. दरवर्षी उन्हाळ्यात लग्न समारंभ व इतर यात्रा महोत्सवादरम्यान पालेभाज्यांना चांगला दर मिळतो. या अनुभवाच्या भरवश्यावर चार एकरात ऊस, मका, कांदा व पालकाची लागड केली. हजारो रुपयांचे बियाणे व खताची योग्य मात्र देऊन कष्टाच्या घामावर पिक डौलदार उभे केले. १० गुंठयातील पालकातून २५ ते ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा होणे अपेक्षित होते. पालक विक्री योग्य झाली. मात्र बाजार भाव पाहिला तर तो ४ ते ५ रुपये किलो. शेतातून मार्केटमध्ये नेण्यासाठीच किलोमागे १०-१३ रुपये खर्च येतो. पालकाची तोड करणे, त्यांना स्वच्छ करून जुड्या बांधणे व ऑटोतून १० किमी दूर असलेल्या मार्केट मध्ये नेऊन विकणे. त्यातही मपाई, तोलाई, हमाली व दलालीचे गणित केले तर फक्त मनस्तापच नशिबी येत असल्याने पालक गुरापुढे मांडण्याची वेळ आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here