अहमदनगर: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. युवक काँग्रेसने या निर्णयाचा निषेध केला आहे. ‘राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून निर्णयाचा फेरविचार करावा,’ अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून नगरमध्ये शहर काँग्रेसच्या पुढाकारातून दिल्ली गेट येथे मोर्चा काढण्यात आला आहे. (Congress Condemns Decision To Postpone Exams)

वाचा:

येत्या रविवारी ही परीक्षा होणार होती. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. पुण्यात यावरून उमेदवारांचा उद्रेक झाला आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून उमेदवार पुण्यात जातात. गेल्या वर्षी स्थगिती झालेली ही परीक्षा रविवारी होणार होती. तीही पुन्हा स्थगित झाल्याने उमेदवारांचा संयम सुटला आहे.

वाचा:

अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या युवक शाखेनेही उमेदवारांची बाजू घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष तांबे यांनी या निर्णयाचा निषेध करून म्हटले आहे, ‘एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच करोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. करोनाचे संकट मोठे आहे. मात्र, दोन-तीन दिवस आधी निर्णय घेणे चुकीचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहून हे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत परीक्षेची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. या निर्णयामुळे उमेदवारांच्या तयारीवर पाणी पडले आहे. राज्य सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून हा निर्णय मागे घ्यावा,’ असेही तांबे यांनी म्हटले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here