पोलिसांच्या माहितीनुसार, ३८ वर्षीय व्यक्ती घरात दारू पित होता. नशेत तो मुलींसोबत गैरवर्तन करत होता. त्याचवेळी पत्नीने त्याचा गळा चिरला. त्या दोघीही मृताच्या सावत्र मुली होत्या. पोलिसांनी ३२ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. तिच्या घराच्या आवारातील खड्ड्यात तिने मृतदेह पुरला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृताच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला.
पोलिसांनी चौकशी केली असता, तिने दिलेली माहिती संशयास्पद वाटली. कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. या महिलेचे आधी एक लग्न झाले होते. तिला पाच मुले होती. मात्र, त्यानंतर घटस्फोट झाला होता. जून २०२० मध्ये तिचे दुसरे लग्न झाले होते. तिच्या दुसऱ्या पतीची तिच्या मुलींवर वाइट नजर होती. त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करायचा, असे आरोपी महिलेने सांगितले. त्याच्या त्रासाला कंटाळून हत्या केल्याचेही तिने सांगितले. महिलेच्या माहितीवरून पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times