मुंबई: बॉक्सिंग प्रशिक्षकाने १४ वर्षीय मुलीवर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील उपनगरात ही घटना घडली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉक्सिंग शिकवण्याच्या बहाण्याने मुलीला प्रशिक्षकाने क्लबमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत जर कुणाकडे वाच्यता केली तर तुझे बॉक्सिंग करिअर उद्ध्वस्त करेन, असेही त्याने धमकावले होते.

टिळक नगर पोलिसांनी आरोपीला बुधवारी अटक केली. आरोपी हा चेंबुरमधील वाशी नाका परिसरात राहतो. त्याच्याविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बॉक्सिंगमध्ये करिअर करायचे होते. पालकांनी तिला बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षकाकडे पाठवले होते. एका क्लबमध्ये तो प्रशिक्षक म्हणून काम करत होता. त्याने मुलीला बोलावून घेतले आणि बॉक्सिंग शिकवण्याच्या बहाण्याने तिला क्लबमध्ये नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here