राज्याचे हे थोड्याच वेळात राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आजच कोव्हॅक्सिन या कोविड प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्यावेळी त्यांनी पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. शिवाय त्यावेळी त्यांनी काही ठिकाणी लॉकाडाउनची शक्यता व्यक्त केली. ते लॉकडाउनबाबत बोलणार का? एमपीएससी परीक्षेबाबत बोलणार का?,… मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Live अपडेट्स…
>> या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसही द्यावी लागणार आहे. त्या सर्वांची तपासणी करणेही आवश्यक आहे- मुख्यमंत्री.
>> जो कर्मचारी वर्ग एमपीएससी परीक्षेला देण्यात येणार आहे तो सध्या करोना मोहिमेच्या कामात सध्या व्यग्र आहे- मुख्यमंत्री.
>> दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून घातक असते, त्यामुळे अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी नियम पाळा- मुख्यमंत्री
>> राज्यात विविध ठिकाणी करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे- मुख्यमंत्री
>> लस घ्यायला कोणीही घाबरू नये- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
>> मास्क वापरणे, हात धुणे, अंतर पाळणे हे नियम पाळावेच लागेल.
>> राज्यात करोनाचा धोका वाढला आहे- मुख्यमंत्री
>> परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार- मुख्यमंत्री
>> वयाची मर्यादा आडवी येणार नाही- मुख्यमंत्र्यांची एमपीएससी परीक्षार्थींना ग्वाही
>> कोणी भडकवत असेल तर भडकू नका- मुख्यमंत्र्यांचे एमपीएससीच्या परीक्षार्थींना आवाहन.
>> एमपीएससी परीक्षेवर कोणीही राजकारण करू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
>> एमपीएससी परीक्षेची नवी तारीख उद्या जाहीर करणार. मात्र, नवी तारीख पुढील तारीख ८ दिवसांच्या आतीलच असेल- मुख्यमंत्री
>> एमपीएससी परीक्षा काही दिवसांसाठीच पुढे ढकण्यात आली आहे.
>> गेल्या वर्षी एमपीएससी तारीख पुढे ढकलण्यात आली होती.. त्यानंतर ती १४ मार्च २०२१ ला होणार असे जाहीर करण्यात आली.
>> एमपीएससी हा विषयही करोनाशी संबंध आहे.
>> थोड्याच वेळात मुख्यमंत्री ठाकरे साधणार जनतेशी संवाद.
>> पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
>> राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने
करावा लागेल असे डोस घेतल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
>> राज्यातील सर्व पात्र नागरिकांनी लस घेण्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
>> मुख्यमंत्री ठाकरे यांनी आजच घेतला कोव्हॅक्सिन या करोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात साधणार राज्यातील जनतेशी संवाद
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times