नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनावरील लसीकरण ( ) मोहीमही वेगात सुरू आहे. कुठल्याही राज्यात लसीचा ( ) तुटवडा नाहीए, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण ( rajesh bhushan ) यांनी दिली.

अमेरिकेतील नव्या कायद्यामुळे लस निर्मितीसाठी ( ) तिथून आयात करण्यात येणाऱ्या कच्चा मालात अडचणी येत आहेत. यामुळे भारत सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला पत्र लिहून केली होती. सरकारने वेळीच दखल न घेतल्यास करोना लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असंही सीरमने पत्रात म्हटलं होतं. आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात सध्या कुठल्याही राज्यात करोना लसीचा तुटवडा नाही, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले. तसंच लसीची किंमत कमी करण्याबाबत कंपन्यांसोबत पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. आम्ही सांगितलेली किंमत ही लक्षणीयरित्या कमी आहे, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली.

आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक नागरिकांना दिली लस

देशात करोनावरील लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजारी रुग्णांना लस दिली जात आहे. आतापर्यंत एकूण २ कोटी ५६ लाख ९० हजार ५४५ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गुरुवार दुपारी १ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

आतापर्यंतच्या लस देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ७१ टक्के लसीकरण हे सरकारी केंद्रावर आणि २९ टक्के लसीकरण हे खासगी हॉस्पिटल्सद्वारे करण्यात आलं आहे.

देशात आज २२ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले

गेल्या २४ तासांत देशात २२,८५४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. १८,१०० जण करोनातून बरे झाले. तर १२६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १ लाख ८९ हजार २२६ इतकी झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here