नागपूर: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा विषय सरकारच्यावतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळला जात आहे, असा आरोप करतानाच ट्रॅक्टर मोर्चे चालतात तर, परीक्षेसाठी करोनाकडे बोट का, असा खरमरीत सवालच विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. त्यांनी नियोजित वेळेवरच ही परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. ( )

वाचा:

विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करतात आणि सरकार ५-६ वेळा परीक्षा पुढे ढकलते. खात्याकडून आयोगाला पत्र गेल्याचे मंत्र्यांना माहीत नाही. सरकारकडून कुणी बोलण्यास तयार नाही. १४ तारखेला परीक्षा असताना विद्यार्थ्यांना आज एसएमएस पाठवण्यात आले. सरकारमध्ये पूर्णपणे विसंवाद आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकारची भूमिका चुकीची आहे. आंदोलने सुरू आहेत. सरकारी पक्षाचे मेळावे, ट्रॅक्टर मोर्चे चालले मग, परीक्षेसाठी संसर्गाचे कारण का सांगता, असा सवालही त्यांनी केला. परीक्षेत आजुबाजूला कुणी बसत नाही. सामाजिक वावरचे पालन केले जाते. त्यामुळेच परीक्षा वेळेवर घ्याव्या, कोणत्याही स्थितीत पुढे ढकलू नये, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वाचा:

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळताच राज्यभरात ठिकठिकाणी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. राज्यातील अनेक शहरांत परीक्षार्थींनी तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तातडीने संवाद साधला व सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोविडची स्थिती लक्षात घेऊन ही परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा निश्चितपणे येत्या आठवडाभरात होणार आहे. तशा सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत आणि उद्याच परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here