अडीच महिन्यांत पहिल्यांदा २२ हजारांवर नवीन रुग्ण
देशात एका दिवसांत करोनाचे २२,८५४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १,१२,८५,५६१ इतकी झाली आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर देशात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी २५ डिसेंबरला २३,०६७ रुग्ण आढळून आले होते. देशात करोनाने १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढून १,५८,१८९ इतकी झाली आहे.
करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के
देशात सध्या करोनाचे १,८९,२२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी १.६८ टक्के आहे. आकड्यांनुसार १,०९,३८,१४६ करोनामु्क्त झाले आहेत. यामुळे करोनामुक्त होणाऱ्या राष्ट्रीय दर ९६.९२ टक्के आहे. तर करोनाने देशातील मृत्यूदर १.४० टक्के आहे.
देशात ८५ टक्क्यांहून अधिक रुग्ण ६ राज्यांत
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूत करोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. देशातील करोनाच्या एकूण रुग्णांपैकी या ६ राज्यांमधील रुग्णांची संख्या ८५.९१ टक्के आहे. केरळमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या वाढली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times