वाचा:
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, करंजे येथील मदनेमळा येथे सुभद्रा विलास मदने या आपल्या शेतात मळणीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे गव्हाची मळणी सुरु असताना पडलेले गहू त्या वेचत होत्या. तेव्हा अचानक त्यांची साडी मळणी मशीनमध्ये अडकली आणि क्षणातच त्या मशीनमध्ये खेचल्या गेल्या आणि ही भीषण दुर्घटना घडली.
वाचा:
सुभद्रा यांच्या शरीराचे मशीनमध्ये अक्षरश: तुकडे तुकडे झाले आहेत. चालकाने मशीन लगेचच बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सुभद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दरम्यान, सुभद्रा मदने यांच्या मृत्यूची बातमी कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times