२०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुहेत होते. महादेवाचे त्यांना वरदान आहे. यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला, असं पत्रकारांशी बोलताना नगरविकासमंत्री सुरेश भारद्वाज म्हणाले.
‘PM मोदींना महादेवाचे वरदान’
संपूर्ण जग पंतप्रधान मोदींकडे एक जागतिक नेता म्हणून बघत आहे. त्यांच्यामुळे करोनावरील दोन लस या भारतात तयार करण्यात आल्या. सर्वाधिक लसीकरण हे भारतात होत आहे. त्यांना महादेवाचे वरदान असल्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे, असं सुरेश भारद्वाज म्हणाले.
‘मोदी हे महादेवाचे अवतार’
महादेवांनी मोदींच्या रुपात अवतार घेतला आहे. त्यांच्यामुळेच करोना संकटात जगातील विकसित देशांत्या तुलनेत भारतात करोनाचा होणारे मृत्यू कमी आहेत, असं नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज म्हणाले. भाजप सरकारमधील या मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुरेश भारद्वाज हे शिमला जिल्ह्याचे आमदार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times