म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :
केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यातील विविध तरतुदी समजावून देण्यासाठी ‘ – किती खुशी किती गम!’ या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम या संस्थेने केले आहे. संस्थेच्या अर्थ विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र टाइम्स माध्यम प्रायोजक आहे. हा कार्यक्रम शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

अर्थसंकल्पाविषयी अलिकडे कुतूहल कमी झालेले दिसत आहे. याचे कारण काही तरतुदी या आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर व पर्यायाने अर्थसंकल्प लागू झाल्यावरही केल्या जाऊ लागल्या आहेत. असे असले तरी केंद्रीय अर्थसंकल्पाचे महत्त्व कमी झालेले नाही. म्हणूनच भांडवल बाजारासह अन्य बाजारही अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले असतात. वाढती महागाई, , , या पार्श्वभूमीवर सरकार अर्थव्यवस्थेची गाडी कशा प्रकारे रुळांवर आणणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या सर्व शंकांचे निरसन सीए संजीव गोखले व अर्थ अभ्यासक डॉ. अभिजित फडणीस करणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here