कोलकाताः नंदीग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( ) यांच्या पायाला झालेल्या दुखापतीवरून राजकारण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसने या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ उद्या दिल्लीत निवडणूक आयोगाच्या ( ) अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसने ( tmc ) लिहिलेल्या पत्रावरून गुरुवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने खडे बोल सुनावले आहेत. तृणमूल काँग्रेसने केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतलेली नाही, असं आयोगाने सुनावलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना आता हॉस्पिटलच्या दुसऱ्या इमारतीत ह

ममता बॅनर्जींबाबत झालेली घटना ही दुर्दैवी आहे. त्या घटनेची योग्य पद्धतीने चौकशी होणं गरजेचं आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसने लिहिलेल्या पत्राला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जींवरील कथित हल्ल्याच्या चौकशीचा अहवाल मिळत नाही तोपर्यंत वीरेंद्र यांना डीजीपीपदावरून हटवल्याचा संबंध जोडणं आणि कुठला अनुभव काढणं योग्य नाही, आयोगाने स्पष्ट केलं आहे. वीरेंद्र यांना डीजीपीपदावरून हटवण्यापूर्वी एडीजींनाही (कायदा सुव्यवस्था ) विशेष पर्यवेक्षकांशी विचार-विनिमय करून हटवण्यात आलं आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करायला हवी हे कायद्याने आवश्यक किंवा बंधनकारक नाही. हे उपाय अस्थायी स्वरुपाचे आहेत, असं सांगत आयोगाने तृणमूल काँग्रेसचे आरोप धुकडावून लावले आहेत.

‘डीजीपीना हटवल्याने हल्ला, भाजपच्या आदेशावर अधिकाऱ्यांचे काम’

तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात अनेक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील निवडणूक आयोगाने डीजीपी वीरेंद्र यांना हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ममतांवर हल्ला झाला. तसंच निवडणूक आयोगाने राज्यातील कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतली आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसंच निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजपच्या इशाऱ्यांवर काम करत आहेत. मग ममतादीदींवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल तृणमूल काँग्रेसने केला.

पुढील चाचण्यांसाठी ममतांना दुसऱ्या इमारतीत हलवलं

दरम्यान, ममता बॅनर्जी यांना कोलकातील एसएसकेएम हॉस्पिटलच्या दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलं आहे. पुढील चाचण्या करण्यासाठी त्यांना हलवण्यात आलं आहे. हॉस्पिटलमधील ६ डॉक्टरांच्या मेडिलक टीमने ममतांची पुन्हा तपासणी केली. त्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत आणि त्यांच्यात सुधारणा दिसून येत आहेत. डाव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना वेदना होत आहेत. त्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे डॉ. एम बंडोपाध्याय यांनी दिली. त्यांच्या डाव्या पायाच्या सीटी स्कॅन करण्यात आला आहे. त्यांच्यावरील पुढील उपचारासाठी मेडिकल बोर्डाची उद्या सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे, असं बंडोपाध्याय म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here