म. टा. प्रतिनिधी, पुणेः एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याच्या कारणातून पुण्यातील झालेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी भाजपाचे आमदार यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर, विक्रांत पाटील, पुनीत जोशी, प्रदीप देसरडा, लक्षण हाके, अभिजित राऊत, संतोष कांबळे, धीरज घाटे यांच्यासह नऊ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर एकूण वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या रविवारी १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलण्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले होते. सरकारच्या निर्यणाविरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीला आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा देत गुरुवारी रात्री उशीरापर्यंत आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पडळकरांना ताब्यात घेतलं होतं. परीक्षेबाबत निर्णय होईपर्यंत रात्री साधारण ८.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.

२१ मार्च रोजी होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here