करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा एमपीएससी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळं जो गोंधळ निर्माण झाला होता यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. तसंच, या प्रकरणात राजकारण करण्यात आलं, असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
‘एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे पण सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा वातावरण तयार करणं बरोबर नाही. आजच एमपीएससीनं नवीन तारखा जाहीर केल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत. तर, एमपीएससी हे प्रकरण हाताळायला कमी पडलं आहे. हे माझं स्पष्ट आणि वैयक्तीक मत आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज करोना आढावा बैठकीत पुण्यातील करोना परिस्थितीबाबत काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याविषयीही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेनं करोना संकट गांभीर्यानं घेण्याची विनंती यावेळी अजितदादांनी केली आहे. काही बाबतीत नियमांचे पालन केलं जात नसल्यानं नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times