रायपूर: छत्तीसगडमधील रायपूरमधील सेरीखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री उशिरा दोन मुलांच्या बापाने एका अल्पवयीन . मुलीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत आरोपीही जखमी झाला. मात्र, तो घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर होरपळलेल्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. अल्पवयीन मुलगी ५० टक्के होरपळली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सेरीखडीमध्य १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. त्याच परिसरात आरोपीही राहतो. गेल्या चार महिन्यांपासून तो तिच्या मागावर आहे. ती जेथे जाते, तेथे तिचा पाठलाग करत होता. त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला.

पीडितेच्या वडिलांनीही आरोपीची समजूत काढली होती. तरीही तो ऐकत नव्हता. अखेर पीडितेच्या वडिलांनी त्याला दम भरला. मुलीला त्रास देऊ नको असे बजावले. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिला फोन करून त्रास देत होता. बुधवारी मध्यरात्री आरोपी मुलीच्या घरात घुसला. अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि बहीण घरीच होते. तो मुलीच्या खोलीत गेला. तेथे दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने तिच्यावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले. याचदरम्यान, तोही होरपळला. त्याच अवस्थेत तो पसार झाला. मुलगी आरडाओरडा करत बाहेर पळत आली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय धावले. त्यांनी आग विझवली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. ती ५० टक्के भाजली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here