म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) झोनल युनिटने दिल्ली-एनसीआर, नवी दिल्ली आणि फरिदाबादेतील ११ बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपन्यांनी २५३६ कोटींचे खोटे आर्थिक व्यवहार दाखवून ४६१.३४ कोटी रुपयांचा आयटीसी मिळविला आहे.

११ पैकी १० कंपन्या दिल्ली-एनसीआर येथील आहेत. या कंपन्यांनी नाशिक आणि धुळ्यातील कंपनीला पुरवठा केल्याचे दाखवून आर्थिक केला. ज्याद्वारे सुमारे ३१५.६५ कोटींचा आयटीसी मिळविण्यात आला. तर एका कंपनीने १४५.६९ कोटी रुपयांचा आयटीसी कमविला. या कंपनीनेही नाशिकमधील काही प्रतिष्ठानांशी आर्थिक व्यवहार केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा पुरवठा कंपन्यांद्वारे करण्यात आला नाही. नागपूर झोनल युनिटचा विचार करता आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दोन वेगवेगळ्या नेटवर्कच्या माध्यमातून या अकराही कंपन्या आर्थिक घोटाळा करत असल्याचे दिसून आले.

एकाच पॅनकार्डचा उपयोग

आयटीसी मिळविण्यासाठी चार कंपन्यांनी एकाच पॅनकार्डचा उपयोग केला. एकाच कार्डचा तपशील त्यांनी जाहीर केला होता. या चारही कंपन्या नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार करायच्या. कंपन्यांनी जागेचा पुरावा म्हणून दिलेल्या पत्त्याचा शोध लावला असता तिथे धार्मिळस्थळ तसेच अन्य व्यक्तींचे निवासस्थान आढळून आले. यावरून खोटी कागदपत्रे देत नोंदणी केल्याचे सिद्ध झाले आहे.

कारवाई दृष्टीक्षेपात

कंपन्यांची संख्या – ११

शहरांची नावे – नवी दिल्ली, दिल्ली-एनसीआर, फरिदाबाद

एकूण खोटा व्यवहार – २५३६ कोटी

एकूण आयटीसी – ४६१.३४ कोटी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here