म. टा. प्रतिनिधी, नगरः नगर जिल्ह्यातील करोना बाधित नवीन रुग्णांची वाढ सुरूच असून शुक्रवारी एकाच दिवशी पाचशेहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: रस्त्यावरून कारवाई सुरू केली आहे. मार्च महिन्याच्या बारा दिवसांतच साडेतीन हजारावर नवे रुग्ण आढळून आले. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घसरले आहे.

औरंगाबाद, पुणे, नाशिक यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील करोनाची स्थिती गंभीर होत असताना नगरमध्येही परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. फेब्रुवारीत लक्षणीयरित्या खाली आलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यात झपाट्याने वाढली. गेल्या बारा दिवसांत साडेतीन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. काल एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर घसरले आहे. अहमदनगर शहर, राहाता आणि संगमनेर या तीन तालुक्यातच यातील निम्म्याहून अधिक रुग्ण आढळले आहेत. नवे रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाला आहे.

यामुळे आता कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी स्वत: रस्त्यावर उतरून पाहणी केली. सरकारी कार्यालये, बसस्थानक, बाजारपेठे फिरून त्यांनी पाहणी केली. नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईही केली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांपासून बाजारपेठेतील दुकानदार आणि ग्राहकांपर्यंत त्यांनी संवाद साधला. नियम मोडताना आढळून आलेल्यांना लगेच दंड करण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here