सर्वसाधारणपणे पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आई- वडील थोडा ब्रेक घेतात. दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर असणं गरजेचं असतं हे जाणून ते तसं प्लनिंगदेखील करतात. परंतु अनिताने मात्र या विचारांना फाटा द्यायचं ठरवलंय. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट वरून ती पहिल्या बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी किती उत्सुक झाली आहे हे जाणवतं. मुळात ती तिच्या गरोदरपणातील पोटाची आठवण येत आहे. त्यामुळे तिने ती दुसऱ्या बाळासाठी तयार असल्याची घोषणाच केलीये. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या गरोदरपणातील आहे आणि तिच्या पतीने म्हणजेच ने तिच्या पोटावर हात ठेवला आहे.
अनिताने हा फोटो शेअर केला आणि म्हटलं, ‘माझ्या गरोदरपणातील पोटाची मला आठवण येत आहे. माझ्याकडे असं पोट आता नाहीये असं नाही, पण हे तितकं सुंदर नाहीये. मी आता दुसऱ्या बाळासाठी तयार आहे. रोहित रेड्डीने आताच अनिता रेड्डीला अनफॉलो केलंय. असं कॅप्शन देत तिने ती दुसऱ्या बाळासाठी तयार असल्याचं म्हटलं. पण हा सगळा खटाटोप खरं तर वाढलेल्या पोटासाठी सुरु असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times