अहमदाबाद, : रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी देण्यात आली नाही. पण त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने रोहितबाबत एक ट्विट केले आहे.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी रोहित शर्माला वगळल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर या संघातील काही महत्वाच्या खेळाडूंना पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचा संघ पाहताना चाहत्यांना यावेळी मोठे धक्के बसले आहेत.

मुंबई इंडियन्सने यावेळी रोहितबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, ” रोहितला पहिल्या काही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे.”

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचा संघ पाहताना चाहत्यांना यावेळी मोठे धक्के बसले आहेत. कारण चाहत्यांना जे वाटत होते, ते यावेळी पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे या संघनिवडीवरुन आता सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रोहित खेळणार नसल्यामुळे यावेळी शिखर धवन आणि लोकेश राहुल हे दोघे भारताची सलामी करतील. त्याच़बरोबर सूर्यकुमार यादवलाही यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी आपले संघातील स्थान कायम राखले आहे. या सामन्यात धवनलाच वगळण्यात येईल, असे म्हटले जात होते. पण त्याचवेळी सर्वांना मोठा धक्का बसला आहे. कारण धवन या सामन्यात खेळणार नसल्याचे सर्वांना वाटले होते. त्यामुळे या सामन्यात रोहित आणि लोकेश राहुल सलामीला येतील, असे सर्वांना वाटले होते.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघासमोर अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे आव्हान होते. टीम इंडियातील स्टार खेळाडू आणि ऋषभ पंत यांच्या निवडीबाबत कोणता निर्णय घेतला जातो याची उत्सुकता सर्वांनाच होती. पंतला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे. गेल्या काही टी-२० सामन्यात विकेटकिपर म्हणून केएल राहुलने संघातील स्थान पक्के केले होते. पण पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून जो शानदार फॉर्म दाखवला आहे, तो पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार नव्हते. भारताच्या या संघात भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. भुवीला यावेळी शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजीमध्ये साथ करेल. त्याचबरोबर युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर असे तीन फिरकीपटू भारतीय संघात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here