वाचा:
प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असल्याचा आरोप केला होता. या सरकारमधील तीन पक्ष आणि नेते यांच्यात समन्वय नसल्याचा टोलाही त्यांनी मारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘नुसते बोलून, आरोप करून काही उपयोग नाही. हे सरकार भक्कम आहे. तीन पक्षांत चांगला समन्वय आहे. त्याउपरही सरकार भक्कम आहे की नाही याचा पुरावाच हवा असेल तर खुशाल अविश्वास ठराव दाखल करा.’
वाचा:
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निवडणूक पुढे ढकलावी म्हणून सत्ताधारी आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार असून जिल्ह्यातही जिल्हा बँक, महापालिका आणि जिल्हा परिषद येथे तीन पक्ष एकत्र आहेत. त्याप्रमाणेच दूध संघातही हे तीन पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले जातील.
वाचा:
सध्या गोकुळ दूध संघावर भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. मंत्री मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढविण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्या विधानाला महत्त्व आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times