आबा महाजन जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथिल आहेत. त्यांच्या आबाची गोष्ट या बालकथासंग्रहासाठी आज साहीत्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कथासंग्रहात शाळकरी मुलांच्या भावविश्वाच्या संस्कार व बोधकथा स्वरुपातील कथा आहेत. मुलांना सत्य, सचोटी व प्रामाणिकपणाची प्रेरणा देणाऱ्या कथा यात आहेत.
आबा महाजन यांची १३ पुस्तके व १० पोस्टर कविता, २ बालकुमार कथा संग्रह, २ बालकुमार कांदबरी प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे ३ पुरस्कार मिळाले आहेत. आबा महाजन यांचे बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.
अहिराणीतही बालकविता
‘मन्हा मामाना गावले जाऊ ‘हा महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता त्यांच्या नावावर आहे. अहिराणी व मराठी असा द्वैभाषिक प्रयोग या पुस्तकात केला आहे. त्यांचा ‘मन्हा गावले’ हा दुसरा संपूर्ण अहिराणी बाल-कुमार कवितासंग्रह आहे. त्यांच्या अनेक कथा/कविता इतर भाषांत अनुवादित झाल्या असून त्यांपैकी काहींचा पाठ्य पुस्तकांत, विद्यापीठ अभ्यासक्रमांत समावेश झाला आहे.
पुरस्कार बालमित्रांना समर्पित
Rपुरस्कार जाहीर झाल्यानंतर आबा महाजन यांनी हा पुरस्कार आपल्या बालमित्रांना तसेच खानदेशातील बोलीला समर्पित केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपल्या बालसाहित्याच्या साधनेची दखल साहित्य अकादमीने घेतली, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना महाजन यांनी व्यक्त केली. बालसाहित्यात आजवर आपण अनेक प्रयोग केले. ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहात निम्म्याहून अधिक कथा या माझ्या बालपणातील घटनांची निगडीत आहेत. खानदेशातील अनेक संदर्भ या कथांमध्ये असल्याचे आबा महाजन यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times