वाचा:
संत गाडगे बाबा विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू यांचे अध्यक्षतेखाली आज आभासी पद्धतीने संपन्न झाली. आजच्या सभेमध्ये वझ्झर, अचलपूर येथील स्व अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहचे () शंकरबाबा पापळकर यांची डी.लिट. मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान देणारे शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाची मानद डी.लिट. देण्याचा निर्णय घेतला होता. यंदा ३७ व्या दीक्षांत समारंभामध्ये शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे अधिसभेमध्ये सर्वांकडूनच अभिनंदन करण्यात आले.
वाचा:
असं एकमेव पुनर्वसन केंद्र!
शंकरबाबा पापळकर हे अनाथ आणि दिव्यांग मुलांचे आधारवड आहेत. वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. भारतातील हे अशाप्रकारचे एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. सध्या वसतिगृहात ९८ मुली आणि २५ मुले असे एकूण १२३ मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित वास्तव्य करत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times