मुंबई : खासगीकरणा विरोध करण्यासाठी सार्वजनिक बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप सोमवार आणि मंगळवारी आहे. तर उद्या दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग चार दिवस सरकारी बँकांची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. या चार दिवसांत एटीएम सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकांनी पुरेशी रोख जवळ बाळगण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी सलग दोन दिवस संप जाहीर केला आहे. ए.आय.बी.इ.ए (AIBEA), आयबोक (AIBOC), एन.सी.बी.इ (NCBE), ए.आय.बी.ओ.ए (AIBOA) , बेफी (BEFI ), इन्बेफ (INBEF), इन्बोक (INBOC), एन.ओ.बी.डब्लु (NOBW) आणि नोबो (NOBO) या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. दरम्यान, उद्या १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

कामगार संघटनांच्या संपामुळे उद्यापासून सरकारी बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. या संपात जवळपास १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयसह प्रमुख सरकारी बँकांच्या सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असला तरी तुम्हाला तातडीचे आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमातून करता येऊ शकतात.

संपामुळे बँक बंद असल्यास तुम्ही ‘या’ पर्यायांनी बँक व्यवहार करू शकता.

१. नेट बँकिंग– आज जवळपास सर्वच बँकांकडून ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा दिली जाते. यामुळे ग्राहकाला घर बसल्या बँकिंग व्यवहार करता येणे शक्य आहे.

२. डेबिट/क्रेडिट कार्ड– ई-कॉमर्स बाजारपेठेच्या विस्ताराने घरबसल्या खरेदी करणे सोपं झालं आहे. जवळपास सर्वच कंपन्या ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाईन खरेदी करता येईल. खाद्यपदार्थही ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतात. ज्याचे पेमेंट कार्डने किंवा ऍपने करता येईल.

वाचा :
३. एटीएम– सर्वसाधारणपणे संप करण्यापूर्वी बँकांकडून एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध केली जाते. त्याशिवाय बहुतांश एटीएम ही बँकिंग सेवेची केंद्र बनली आहेत. ज्यात तुम्हाला चेक जमा करणे, चेकबुक रिक्वेस्ट टाकणे, पैसे काढणे, जमा करणे तसेच हस्तांतर करणे यासारखी महत्वाची कामे करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

४. ई-वॉलेट्स– कॅशलेस इकाॅनॉमीतले सर्वात सोयिस्कर माध्यम म्हणून ई-वॉलेट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहेत. छोट्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी ई-वॉलेट्सचा मोठ्या संख्येने वापर केला जात आहे.

५. डिजिटल पेमेंट्सचा पर्याय– जर तुम्हाला वीज देयके किंवा इतर देणी चुकती करायची असल्यास तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा पर्याय स्वीकारू शकता. रांगेत वेळ दवडण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही वेळ वाचवू शकता.


६. ‘एनईएफटी’ ()/ ‘आरटीजीएस’ ()– नॅशनल इलेक्ट्राॅनिक फंड ट्रान्सफर सेवेमुळे (एनईएफटी) देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. ‘एनईएफटी’मध्ये देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात. १ जानेवारीपासून ‘एनईएफटी’ निशुल्क झाले आहे. त्याचबरोबर ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ग्राहक पैसे हस्तांतर करू शकतो. यासाठी ग्राहकाकडे आॅनलाइल बँकिंग सेवा असल्यास तो कुठूनही NEFT आणि RTGS चे व्यवहार करु शकतो. या दोन्ही सेवा २४ तास सुरु असतात.

७. IMPS (आयएमपीएस)– इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात ‘आयएमपीएस’ ही २४ तास चालणारी ऑनलाईन सेवा आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेत नोंदणी करावी लागेल. ‘आयएमपीएस’मधून तुम्ही दोन लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here