कोल्हापूर: येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. शिवसेनेने आपल्या स्टाइलने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. ( )

वाचा:

कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने कर्नाटकात जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या. सायंकाळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख , संजय पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये घुसले. तेथे अनेक कर्नाटकच्या बसेस होत्या. या बसेसवर काळे फासण्यात आले. त्यांना रोखण्यात आले. कन्नड समर्थकांनी जो मराठी बांधवावर अन्याय सुरू केला आहे, तो खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. बेळगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा कोल्हापुरात जोरदार निषेध करण्यात आला.

वाचा:

नेमकं काय घडलं?

बेळगावात शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर भ्याड हल्ला केला व त्यांच्या गाडीवर असलेला भगवा ध्वज काढून टाकला. त्याचवेळी गाडीवरील शिवसेनेच्या भगव्या फलकाला काळे फासण्यात आले. शिरोळकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत बेळगाव येथील रामलिंगखिंड गल्लीतून शिवसेना कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले त्याचवेळी हा प्रकार घडला. तेथे दबा धरून बसलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळकर यांना लक्ष्य केले. शिरोळकर यांच्या गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी तेथे पोलीसही उपस्थित होते. मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. शिरोळकर यांनी एकट्याने या सर्वांचा प्रतिकार केला. या घटनेने सीमाभागात संतापाची लाट उसळली असून शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. बेळगावचे पोलीस उपायुक्त विक्रम आपटे यांनी या घटनेबाबत चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here