म. टा. प्रतिनिधीः जळगावः जळगाव जिल्ह्यातील करोनाच्या संसर्गाचा ( ) झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देखील सलग तिसऱ्या दिवशी नऊशेपार नविन बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ९८२ नवे कोरोना बाधित रुग्ण समोर आले. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६८ हजार ६२ इतकी झाली आहे. शुक्रवारी देखील ५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एका ३० वर्षीय रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये करोनाने हात पसरायला सुरुवात केली आहे. जळगाव शहर हे सद्यस्थितीत जिल्ह्यातील करोनाचा प्रमुख हॉटस्पॉट आहे. जळगावात शहरात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६३ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. दिवसभरात ५१२ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. जळगाव शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल गुरुवारी रात्रीपासून तीन दिवसांच्या जनता कफ्यूची अंमलबजावणी केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१३ इतकी झाली आहे. त्यात १ हजार ३८२ रुग्णांना लक्षणे आहेत. तर ५ हजार ३३१ रुग्णांना लक्षणे नाहीत. चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूदर हा २.९ टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट देखील घसरून ८८.१४ टक्के आहे. सध्या २८३ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर २५२ रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ४२ वर्षीय व ८० वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील ३० वर्षीय तरुण, भुसावळ तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष तर चोपडा तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शुक्रवारी असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ३६३, जळगाव ग्रामीण १९, भुसावळ १९८, अमळनेर १४, चोपडा ७४, पाचोरा ३०, भडगाव १, धरणगाव ८, यावल १३, एरंडोल ४, जामनेर ४०, रावेर १८, पारोळा ४७, चाळीसगाव १४२, मुक्ताईनगर ४ , बोदवड ६ , इतर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here