ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी परिसरात गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई ह्या त्यांची दोन मुले आणि एका मुलीसोबत वानाडोंगरी परिसरात राहतात. राजू बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या पैशांसाठी तो अनेकदा कुटुंबीयांशी भांडतो व त्यांना मारहाणसुद्धा करतो. काही दिवसांपूर्वीच त्याचे बहिणीशी भांडण झाले. त्याने तिलासुद्धा मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्याला अटक करण्यात आली व त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. दोन दिवसापूर्वीच तो कारागृहातून सुटून आला होता. लक्ष्मीबाई घरगुती कामे करतात. राजुने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागीतले. त्यांनी नकार दिल्याने भांडणास सुरुवात झाली. त्याने रागाच्या भरात लक्ष्मीबाई यांच्या डोक्यात फरशी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी राजूवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times