मुंबईः ” या मालिकेची सध्या घराघरांत चर्चा आहे. आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या लग्नानंतर मालिका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. आसावरी- अभिजीत राजेंचा संसाराला सुरुवात होत आहे तर, एकीकडे सोहम आणि शुभ्राचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. सोहमच्या हट्टी व स्वार्थी स्वभाव शुभ्रासमोर आल्यानं ती सोहम पासून वेगळं होण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

अभिजीत आणि आसावरीचं लग्न सोहमच्या मनाविरुद्ध झालं असल्यानं आता त्या दोघांना वेगळं कसा करता येईल याच्या योजना आखताना दिसत आहे. सोहमची ही खेळी शुभ्रच्या लक्षात आल्यानंतर तिनं याविषयी सोहमला जाब देखील विचारला मात्र तेव्हाही सोहमनं उर्मटपणे उत्तर देऊन शुभ्राला घर सोडून जाण्यास सांगितलं आहे. सोहमचा खोटेपणा उघड झाल्यानंतर शुभ्रा काय निर्णय घेतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, अभिजीत आणि आसावरी या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी सोहम शुभ्राला घेऊन राजस्थान-उदयपूरला गेला होता. दोघांना एकत्र वेळ घालावायला मिळू नये होण्यान धडपड करतानाही दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here