रालोसपा नेत्यांना राजदमध्ये प्रवेश देताना तेजस्वी आनंदी दिसत होते. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत रालोसपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भूदेव चौधरी यांनीदेखील राजदमध्ये एन्ट्री केली होती. ‘या नेत्यांनी अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांना रालोसपातून बाहेर काढत संपूर्ण पक्षाचा विलय राजदमध्ये केला आहे’ असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.
‘नितीश कुमार यांच्यासारखा मित्र असेल तर शत्रूची गरज पडणार नाही’ या उपेंद्र कुशवाहा यांच्या वक्तव्याची आठवणही तेजस्वी यादव यांनी या निमित्तानं पुन्हा करून दिली. वीरेंद्र कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार, नितीश कुमार यांना सत्तेतून हटवण्यासाठी रालोसपा बनवण्यात आली होती. परंतु, उपेंद्र कुशवाहा हा संकल्प विसरले आहेत आणि त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, आता तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांना सत्तेतून खाली खेचण्याचा आपला संकल्प आहे, असंही वीरेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं.
काही दिवसांपासून उपेंद्र कुशवाहा यांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळीक वाढलेली दिसून आली होती. परंतु, रालोसपा जेडीयूसोबत आघाडी करणार नाही तर आपल्या पक्षाचा नितीश कुमार यांच्या पक्षात विलय होणार असल्याचं म्हटलं जात होतं. यासंबंधी दोन्ही नेत्यांत अनेक बैठकीही झाल्याचं सांगण्यात येत होतं. १४ मार्च रोजी पक्षाच्या बैठकीनंतर याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही म्हटलं जात होतं. मात्र या बैठकीआधाच या निर्णयावर नाराज होत पक्षातील साथीदारांनी मात्र त्यांचा हात सोडण्याचा निर्णय घेतला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times