मुंबई: काही वर्षांपूर्वीच अभिनेता हृतिक रोशनचा घटस्फोट झाला आणि तो पत्नी सुझानपासून वेगळा झाला. अर्थात घटस्फोटानंतरही दोघांमधील मैत्रीचं नातं कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांसाठी सुझाननं हृतिकच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. एकीकडे एका मुलखातीत हृतिनं सुझानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न करणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं तर दुसरीकडे सध्या सुझानबाबत सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू आहेत.

बिग बॉस स्पर्धक अली गोनीचा भाऊ अर्सलान आणि सुझान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, सुझान आणि अर्सलान एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि अनेकदा ते दोघंही एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. मागच्या ६ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून अर्सलान आणि सुझान एकमेकांना ओळखतात. या दोघांची ओळख टीव्ही इंडस्ट्रीतील काही मित्रांच्या माध्यमातून झाली होती. पण मागच्या काही काळापासून सुझान आणि अर्सलान यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे.

दरम्यान सुझान आणि अर्सलाननं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या वागण्यातून अनेकदा ते दोघं केवळ मित्र नाहीत तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं नातं या दोघांमध्ये असल्याचं लक्षात येतं. हे दोघंही अनेकादा त्यांच्या मित्रपरिवारासोबत आउटिंगसाठी गेलेले दिसतात.

आणि सुझान यांनी २००० साली लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १३ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. २०१४ मध्ये दोघंही कायदेशीरित्या वेगळे झाले. घटस्फोटानंतर हृतिक-सुझानमधील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांसोबत ते अनेकदा एकत्र फिरायला जाताना, डिनर किंवा लंचला जाताना स्पॉट होतात. एवढंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुझान हृतिकच्या घरी राहत होती. तसेच हृतिकच्या चांगल्या-वाईट काळात सुझान नेहमीच त्याला पाठिंबा देताना दिसते. ज्यावरून हे दोघं पुन्हा एकत्र येतील असा अंदाज चाहते लावताना दिसतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here