अमरावतीः अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ ट्रक आणि ट्रक्टरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर, दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. ()

तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथून जनावरांसाठी चारा आणायला नागपूर दिशेने हे शेतकरी निघाले होते. मात्र, मागून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जबर धडक दिल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली.हा अपघात इतका भीषण होता की जागीच दोन्ही झाला आहे. या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत तर दोघे जण गंभीर जखमी झाले. कैलास हुंडीवाले (४०) व हुंडाआप्पा बहीहट (५५) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तसेच संजय दिवटे व मुकेश बिरकट असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

वाचाः

दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टरला धडक देणाऱ्या ट्रॅकचालकाने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here