कोल्हापूर: मध्यवर्ती बस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी केली. हा प्रकार घडताच उपस्थित लोकांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार घडल्यानंतर कर्नाटकात जाणारी महाराष्ट्र बस सेवा, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी कर्नाटकाची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. (an unidentified person hurled stones at a at )

काल शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड रक्षक वेदिके संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. या वादाचा परिणाम एसटी महामंडळाच्या बससेवेवर झाला आहे.

बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला करत गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. या घटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोल्हापुरात शिवसैनिकांनी बस स्थानकावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले होते.

वाचा सविस्तर वृत्त-
त्यानंतर आज सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्राच्या बसवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या घटनेमुळे चिघळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here