मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नावाने अनेक वर्षे राजकारण केले. मात्र हा मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही याची खबरदारी त्यांनी आजपर्यंत घेतली, अशा शब्दांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. (bjp state president criticizes and regarding )

तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र, तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती. मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे हेच तुमचे धोरण, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी एकावर एक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला. चंद्रकांत पाटील एका ट्विटमध्ये म्हणतात, ‘अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजप सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला.’

‘भाजप सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले’

भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. हे आरक्षण न्यायालयात भक्कमरित्या टिकवलं सुद्धा. पण या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

सत्तांतर झाल्यावर भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केले. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकवण्यासारखाच भक्कम बनवला, असे सांगत पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठा समाजासमोर अनंत समस्या निर्माण झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे. पण हे अकार्यक्षम सरकार मुद्दाम मराठा समाजाची हेळसांड करत आहे, असा आरोपही त्यांनी केले.

क्लिक करा आणि वाचा-
मराठा समाजाच्या समस्या आणखी गंभीर होत चालल्या आहेत. त्यामुळे आता आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. करण्यासारखे खूप काही होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने काहीही केले नाही, असे पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातही मराठा समाजाची बाजू तुम्हाला मांडता आली नसल्याचेही ते म्हणाले.

१०२ वी घटनादुरुस्ती मराठा आरक्षणाला लागू होत नसल्याचे आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाला सांगितले होते, असे पाटील यांनी म्हटले आहे. कारण राज्याच्या मराठा आरक्षणाचा कायदा त्यापूर्वीचा आहे. उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य केले. मात्र आताच्या सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडण्याच्या ऐवजी त्याला फाटे फोडले असेही पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वतः देवेंद्रजी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावलं उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here