मुंबई– बॉलिवूडमध्ये आणि अक्षय कुमारची जोडी पावर कपल मानली जाते. भलेही ट्विंकलने मोठ्या पडद्याला रामराम केला असला तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. तिच्या बुद्धिमतेमुळे आणि उत्तम विनोद करण्याच्या कलेमुळे सोशल मीडियावर ती सगळ्यांची चाहती बनली आहे. ती नेहमीच चाहत्यांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. कधीकधी ती राजकारणावरही मुद्देसूद मत मांडताना दिसते. अनेकदा ती चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टीदेखील सांगत असते. अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनाही मने जिंकणारी ट्विंकल सध्या अक्षयसोबत सुट्ट्यांची मजा घेताना दिसतेय. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना घटस्फोटापासून वाचण्याचा एक मार्ग सांगितला आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात ती आपल्या पतीसोबत म्हणजेच अक्षयसोबत दिसत आहे. ते दोघेही समुद्र किनाऱ्यावर एका बोटीत असल्याचं दिसतंय. पहिल्या फोटोत ते दोघेही कॅमेराकडे पाहत हसताना दिसतायत. तर दुसऱ्या फोटोत ट्विंकल अक्षयच्या मांडीवर बसून त्याच्यासोबत मस्ती करत आहे. तिने त्याचं नाक जोरात दाबून धरलंय आणि अक्षय तिच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करतोय. या फोटोंसोबत तिने एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे की, ‘जोडपं इन्स्टाग्रामवर आणि खऱ्या आयुष्यात. जेव्हा समोर कॅमेरा ठेवलेला असतो तेव्हा आपण जसे हसतो तसेच जर एकमेकांना पाहून खऱ्या आयुष्यात हसलो तर घटस्फोटाचं प्रमाण नक्की कमी करता येईल.’ त्यासोबत तिने हसण्याचा इमोजी टाकला आहे.

अक्षय आणि ट्विंकलचं एकमेकांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. अनेकदा अक्षयने ट्विंकलवरील त्याचं प्रेम दाखवण्यासाठी तिला भेटवस्तूदेखील दिल्या आहेत. त्यासोबतच दोघांच्या एकमेकांसोबतच्या मजामस्तीचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर वायरल होत असतात. त्यांनी १७ जानेवारी २००१ साली लग्न केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यात भांडण झाल्याच्या चर्चा खूप कमीवेळा ऐकायला मिळाल्या. ते दोघेही एकमेकांना पूर्ण पाठिंबा देत एकमेकांच्या साथीने संसार करत असल्याचं दिसतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here