नाशिकः राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

नाशिकमधील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, १० वी ते १२वीचे वर्ग पालकांच्या समंतीने ऐच्छिक सुरु राहणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. तसंच, करोनासंबंधीचे नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विषेश, म्हणजे पोलिस आणि पालिकेकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारातील गर्दी दिसली तरी कारवाई करण्यात येणार आहे.

होम आयसोलेशनमध्ये असणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर आहेत. अशा नागरिकांना शोधून त्यांना जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांबरोबरच शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही कारवाईचा बडगा उलचलला जाणार आहे. पालिकेकडून आरोग्य पथकांची विशेष निर्मिती करण्यात आली आहे. व दोन हेल्पलाइन क्रमाक जारी करण्यात आले आहेत.

शहरातील करोनासंबंधित उपाययोजनांबाबतीतही पालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयातील एकूण बेडची क्षमता ३२८४ इतकी आहे तर, सरकारी रुग्णालयात सध्या ३२७ रुग्ण उपचार घेत असून २९५७ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. तर, शहरात ५ हजार व्हॅक्सीनचा साठा उपलब्ध आहे. व सरकारकडून आणखी ५० हजार डोस मागवण्यात आले आहेत. शहरात सध्या ५३३ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.

१५ दिवसात पालिकेची बिटको रुग्णालय व सॅम्पल टेस्टिंग लॅब उभारण्यात येणार असून दररोज २ हजार सॅम्पल तपासणी होणार आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून खासगी लॅबकडून दिल्या जाणाऱ्या अहवालांची तपासणी करण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here