म .टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर कन्नड रक्षण वेदिके संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळला आहे. त्याचे कोल्हापुरातही पडसाद उमटले असून शनिवारी सकाळपासून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या बसेस व कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत कर्नाटकातून येणाऱ्या सर्व ट्रकना महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी केली. ( has demanded a coming from in )

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी बेळगाव येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरोळकर यांच्यावर करवे संघटनेने हल्ला केला. त्यांच्या वाहनावरील भगवा ध्वज व शिवसेनेचा फलक काढून टाकून त्याला काळे फासण्यात आले. त्यानंतर या घटनेचे पडसाद शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात उमटले. शिवसेनेने आंदोलन करत कर्नाटकच्या बसेसना काळे फासले.

शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. तेथे उपस्थित असलेल्या काहींनी त्या इसमास बेदम चोप देऊन शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या घटनेनंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. महाराष्ट्रातील बसेसना कर्नाटकात जाण्यास अटकाव करण्यात आला. याशिवाय कर्नाटकातून ज्या रोज महाराष्ट्रात बसेस येतात, त्यांनाही रोखण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

दुपारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले. कर्नाटक पासिंगच्या
ट्रकना महाराष्ट्रात सोडू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. कन्नड संघटनांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून सीमा भागातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here