मुंबई : अलिबागमधील व मुंबईतील येथील जागेबाबत बिनबुडाचे आरोप करून भाजपचे माजी खासदार यांनी माझी, माझ्या कुटुंबांची व शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे, असे नमूद करत शिवसेना आमदार यांनी सोमय्या यांना मानहानीची नोटीस धाडली आहे. सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच वायकर यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या नोटिशीत दिला आहे. ( Ravindra Waikar Sent Defamation Notice To Kirit Aomaiya )

वाचा:

किरीट सोमय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर आणि यांच्यावर जमिनीबाबत आरोप केले होते. अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर व ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या जमिनीवरील बंगल्यांचा वापर व्यवसायासाठी केल्याचा व एका बंगल्याची किंमत ५ कोटी रुपये असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. या दोन्ही ठिकाणच्या जमिनींबाबतच्या आरोपांचा नोटिशीत उल्लेख करत वायकर यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सोमय्या यांनी कोणतेही सबळ पुरावे न देता आरोप केले आहेत. त्यामुळे माझी, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या पक्षाची नाहक बदनामी झाली आहेच शिवाय जनमानसात असलेली प्रतिमाही मलिन झाली आहे, असे नमूद करत सोमय्या यांनी जाहीर माफी मागावी, अशी समजच या नोटिशीत देण्यात आली आहे. सोमय्या यांनी माफी मागितली नाही तर पुढील सिव्हिल व क्रिमिनल कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटिशीत दिला आहे.

वाचा:

…म्हणून पाठवली नोटीस

कोर्लाई जमीन प्रकरणी सोमय्या यांच्या आरोपांची काही प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली आहे. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरण पुढे केले. माझ्यावर खोटे आरोप करीत जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यानंतरही सातत्याने ते बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत. त्यामुळेच त्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, असे वायकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून ही नोटीस आपल्याला मिळाल्याचे नमूद केले आहे. रविंद्र वायकर यांनी मानहानीची ९ पानांची नोटीस मला पाठवली आहे आणि ती मला मिळाली आहे. या नोटिसीचे मी स्वागत करतो, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here