गाझियाबाद, : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या धर्मीय मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही घटना घडलीय. ( Boy Thrashed for Drinking Water from , One Arrested after video goes viral )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली. अश्वनीकुमार यादव याचा मुलगा श्रृंगी नंदन यादव याला मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आलीय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. मुलाच्या नावावरून तो मुस्लीम धर्मीय असल्याचं लक्षात येत आहे. ‘तू मंदिरात प्रवेश केलासच कसा?’ असा प्रश्न विचारत आरोपी मुलाला मारहाण करताना या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतंय.

ज्या मुलाला मारहाण करण्यात आली तो आपण ‘पाणी पिण्यासाठी मंदिरात आलो होतो’ असं उत्तर देतानाच मारहाण न करण्याची विनंती करताना दिसत आहे.

धर्माचा ठेकेदार बनलेल्या या गुंडांनी मुलाला कोणतीही सहानुभूती न दाखवता केवळ मंदिरात प्रवेश केल्यामुळे मारहाण केल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियात उमटलेले दिसून आले.

गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here