वाचा:
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील करोना स्थिती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली होती. जिल्ह्यातील कोविड-१९ रोगाचा वाढत असलेला प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची या बैठकीत त्यांनी माहिती घेतली व काही सूचना केल्या. याच बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून बाजारपेठांची वेळ वाढवण्याबाबतचे संकेत दिले आहेत.
वाचा:
याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नेमका किती वेळ वाढवून देणार, हे स्पष्ट नसले तरी वेळ वाढणार हे जवळजवळ निश्चित समजले जात आहे. करोना प्रतिबंधासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी. लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे. यंत्रणा सुरळीत, जलद व अचूक असावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
वाचा:
दरम्यान, अमरावती आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील लोकांमध्ये कोविड १९ बद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी या दृष्टीने मोबाइल व्हॅन रस्त्यावर उतरवण्यात आली असून यशोमती ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून या व्हॅनचे उद्घाटन केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times