करोनाचा आलेख कोणत्या दिशेला वळवायचा हे आपल्याच हातात आहे. करोनाचा हा व्हायरस मुंबईत पसरणार नाही यासाठी आपल्याला काम करावे लागेल आणि ते मुंबईकरांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नाही, असे महापालिकेनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे.
याबरोबरच महापालिकेने यासाठी गेल्या तीन महिन्यांची करोनाबाधितांची आकडेवारी देखील या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. महापालिका आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, ‘२०२१ ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत २३९ नवे रुग्ण वाढले. तर पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे रुग्ण वाढले. तसेच या महिनयात ११ मार्चला तब्बल १५०८ नव्या करोना रुग्णांचे मुंबईत निदान झाले. हा आलेख कोणत्या दिशेने जावा, हे ठरवणे आपल्या हातात आहे. या विषाणूला मुंबईवर मात करू देऊ नका. मुंबई, तुझ्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, मुंबईत १२ मार्च या एका दिवशी १६४६ नवे रुग्ण आढळले. तर ४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्णांची संख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण या मुंबईच्या आसपास असणाऱ्या महानगरपालिकांना शहरात करोनाबाबतचे कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत. मुंबईची स्थिती पाहता मुंबईत देखील असेच निर्बंध लागू होऊ शकतात का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईकरांना घातलेली साद महत्वाची मानली जात आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times