पीडित महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी निरीक्षकाविरुद्ध अत्याचार, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अरविंद भोळे (वय ५४, रा. फ्रेण्डस कॉलनी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. भोळे हे पोलिस नियंत्रण कक्षात तैनात आहेत.
भोळे हे विवाहित आहेत. काही वर्षांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचे अपघातात निधन झाले. ती मुलासह राहायची. दरम्यान, जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकद्वारे तिची भोळे यांच्यासोबत ओळख झाली. भोळे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखविले. महिला ही अमरावतीहून नागपुरात आली. भोळे याने तिला वर्धा येथे नेले. तिथे तिच्या गळ्यात हार टाकून लग्न झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते तिला फ्रेण्ड्स कॉलनी येथे घेऊन आले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, उपचाराच्या बहाण्याने भोळे यांनी महिलेकडून एक लाख रुपये घेतले. एक महिन्यापूर्वी तिच्याकडील तीन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन भोळे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times