मुंबई: राज्यात करोनाचा (Coronavirus in Maharashtra) धोका कमी होताना दिसत नसून आजही गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ही संख्या कालच्या तुलनेत केवळ २१५ने कमी आहे. काल ही संख्या १५ हजार ८१७ इतकी होती. तर, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७ हजार ४६७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ११ हजार ३४४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५२५ वर जाऊन पोहचली आहे. ( Latest updates)

आज राज्यात एकूण ८८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ५६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ टक्के इतका आहे. राज्यात आज ७ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख २५ हजार २११ रुग्ण बरे झाले आहेतय. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७४ लाख ०८ हजार ५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ९७ हजार ७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७० हजार ६९५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५२५ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २४ हजार २५ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो १६ हजार १४ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ११ हजार ४४७ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या ११ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

या बरोबरच नागपूरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १४ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ३५७ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ४ हजार १९, औरंगाबादमध्ये ६ हजार २६३, जळगावमध्ये ४ हजार ९७२, अहमदनगरमध्ये २ हजार ७६६ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ३७० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १९६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here