मुंबई: राज्यातील संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सातत्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्याअनुषंगाने विविध स्तरांवर त्यांच्या आढावा बैठकाही सुरू असून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ( )
वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
वाचा:
मुखमंत्र्यांनी बैठकीत लॉकडाऊनबाबत सरकारची भूमिका नव्याने स्पष्ट केली. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले. आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times