श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण (Gautam Hiran) यांचे अपहरण व खून प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले असून आरोपींना सिन्नर येथून अटक केली. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (the accused in the and murder case were arrested from sinnar)
हे प्रकरण राज्यभर गाजले होते. व्यापारी संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ते उचलून धरले होते. शेवटी पोलिसांनी त्याचा छडा लावला. संदीप मुरलीधर हांडे (वय२६, रा . माळेगांव , ता. सिन्नर, जि. नाशिक), जुनेद उर्फ जावेद बाबु शेख (वय २५, रा. सप्तश्रृंगीनगर , नायगांव रोड , सिन्नर जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (वय २६ रा. पास्तेगांव, मारुती मंदीरासमोर , सिन्नर , जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम ( वय २९, रा. उक्कडगांव, ता. कोपरगांव , जि अहमदनगर) व एक २२ वर्षीय आरोपी यांना अटक करण्यात आली.
१ मार्च रोजी बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे त्यांचे बेलापूर येथील दुकान बंद करुन मोटार सायकलवरुन सायंकाळी ७ वा. चे सुमारास बोराबके नगर, श्रीरामपूर येथील घरी जाण्यासाठी निघाले होते तेव्हा कोणीतरी त्यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्रचे प्रताप दिघावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे फिरविली. आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तसेच श्रीरामपूर शहर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामूळे व गुन्हा घडलेल्या कालावधीमध्ये व त्यानंतरचे कालावधीमध्ये श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये–जा झालेली असल्यामूळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते .
क्लिक करा आणि वाचा-
अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांचेवर लक्ष केंद्रीत केले. प्रथम संदीप मुरलीधर हांडे याला नाशिक येथून ताब्यात घेतले. पुढील तपासामध्ये आरोपी जुनेद उर्फ जावेद बाबु शेख, अजय राजू चव्हाण, नवनाथ धोंडू निकम व एक २२ वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले .
क्लिक करा आणि वाचा-
सर्व आरोपी ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तपासामध्ये आरोपीताकडून मयत गौतम हिरण यांचा मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली व्हॅन ( एम एच १५ जी एल ४३८७) असा मुद्देमाल जप्त केला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times