सोलापूर: वाढती महागाई, पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसची प्रचंड भाववाढ, बेरोजगारांचा भस्मासूर, कोसळलेले शेअर बाजार,घसरलेला जीडीपी यामुळे मोदी सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर ‘थाली बजाओ’ निषेध आंदोलन केले. सोलापुरातही हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘गो मोदी गो’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ( workers staged a against the Modi government)

भारतातील सर्वच नागरिकांची अवस्था खूपच बिकट झाली असून महागाईच्या बोजामुळे सर्व सामान्यांन कंबरडे मोडलं आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर सोडले. ‘गो कोरोना गो’ म्हणून थाली बजाओचा मोदींचा नारा संपुर्ण देशभरातून प्रत्येक नागरिकानं घुमवला. पण आता ‘गो मोदी गो’, ‘गो महागाई गो’, ‘गो बेरोजगारी गो’, म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केले. आता थाळी वाजवण्याची ेवेळ सर्वसामान्यांवर आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. आंदोलनाच्या वेळी ‘सब जगह से पड रही मार, thank you ‘ अशी घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देत होते.

क्लिक करा आणि वाचा-

महागाईमुळे अनेकांच्या घरात अन्न-पाण्याविना रिकामी थाळीच वाजवावी लागत आहे. या कुंभकर्णासारख्या झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग यावी यासाठी सर्वसामान्यांच्या आक्रोशचा आवाज या ‘थाली बजाओ’च्या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाच्या वतीने व्यक्त केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here