मुंबई : सिक्सर किंग ही मिळालेली उपाधी भारताचा माजी धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंगने पुन्हा एका योग्य असल्याची दाखवून दिली. कारण युवराजने पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये षटकारांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले आहे. युवराजच्या या फलंदाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या रोड सेफ्टीसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होता. या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने यावेळी संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. सचिनने यावेळी फक्त ३७ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. पण सचिन बाद झाल्यावर मैदानात युवराज सिंगचे वादळ घोंघागवल्याचे पाहायला मिळाले.

युवराजने यावेळी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. यावेळी जुना युवराज पुन्हा मैदानात परतल्याचे पाहायला मिळाले होते. कारण यावेळी युवराजने यावेळी एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहत्यांना यावेळी युवराजने दक्षिण आफ्रिकेत एकाच ओव्हरमध्ये खेचलेल्या सहा षटकारांची आठवण झाली. युवराजने या सामन्यात फक्त २२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. सचिन आणि युवराज या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. भारतीय संघाने यावेळी २० षटकांमध्ये फक्त तीन फलंदाज गमावत २०४ धावा केल्या.

युवराजने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात एकाच षटकात सहा षटकार खेचले होते. भारताचा हा सामना इंग्लंडबरोबर होता. या सामन्यात युवराज आणि इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फिन्टॉफ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी युवराज त्याच्या दिशेने चाल करुन गेला होता. त्यावेळी युवराजला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पंचांनी थांबवले होते. पण त्यानंतरच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये युवराजने तब्बल सहा षटकार खेचले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here